breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अंधश्रध्दा दूर व्हावी, म्हणून चिंचवडमध्ये ग्रहणासोबत चहा-पान उपक्रम

पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रात सुर्यग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींची गर्दी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

दशकभराच्या प्रतीक्षेनंतर सूर्यग्रहण पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्रात पालकासह विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी अंधश्रध्दा दूर व्हावी म्हणून ग्रहणासोबत चहा-पान हा उपक्रम राबविण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना सुर्यग्रहण दाखवण्यासाठी सायन्स पार्कने पुढाकार घेतला होता. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना खुले करण्यात आले. सायन्स पार्कच्या आवारात टेलिस्कोपला फिल्टर लावून हे ग्रहण पाहण्याची सोय करण्यात आली. याखेरीज ग्रहण पाहण्यासाठी तयार करण्यात आलेले खास चष्मेही देण्यात आले होते. परंतू, ढगाळ वातावरणामुळे काहींशी विद्यार्थ्यांची निराशा झाली.

skyview या मोबाईल अॅंपद्वारे सुर्यग्रहण दाखवण्यात आले. खगोल विज्ञानची विद्यार्थ्यांना फिल्म दाखवण्यात आली. ग्रहणात काही खाऊ नये, असा गैरसमज आहे. मात्र, ही अंधश्रध्दा दूर व्हावी, म्हणून ग्रहणासोबत चहा-पान या उपक्रमाचे आयोजन केले होते. हे ग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, ‘प्रशांत अलिबागकर यांनी सूर्यग्रहणा संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना दिली ’’, अशी माहिती सायन्स पार्कचे शैक्षणिक समन्वयक सुनील पोटे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button