breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील 26 नगरसेवकांवर खून, दरोडा, फसवणूकीचे गंभीर गुन्हे

– भाजपचे सर्वाधिक नगरसेवक गुन्हेगार
गुन्हेगार नगरसेवक वाल्यांचे वाल्मिकी कधी होणार ?
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरात कायदा-सुव्यवस्था ढासळी म्हणत पोलिस प्रशासनावर कोरडे ओढणाऱ्या नगरसेवकांपैकी २६ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. फसवणूक, खून, हाणामारी, दरोड्याची तयारी असे गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवकांमध्ये सत्ताधारी भाजपची संख्या तलुनेने अधिक आहे. तसेच मागील दीड वर्षात सात नगरसेवकांवर आणि चार नगसेविकांच्या पतींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
पिंपरी – चिंचवड शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय मिळाल्यानंतर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कमी मनुष्यबळ आणि अपुऱ्या साधन-सामृग्रीत अधिकारी अनेक प्रयत्न करीत आहेत. पुणे शहर पोलिसांकडील पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसदलातून पाच पोलिस ठाणी मिळून १५ पोलिस ठाण्यांचे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले. अडीच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या आयुक्तालयाकडे गृहविभाग आणि शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे अवघ्या काही दिवसातच उघड होऊ लागले आहे. पोलिसांना गस्तीसाठी लागणारी वाहने, मनुष्यबळ, इन्फ्रास्ट्रक्चर आदींची कमतरता आहे.
यासाठी शहरातील दोन खासदार, तीन आमदार आणि १२८ नगरसेवकांकडून म्हणावे तेवढे प्रयत्न होत नसल्याचेही पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. महापालिकेने आयुक्तालयासाठी इमारत देऊ केली आहे. मात्र, वाहने आणि मनुष्यबळासाठी या पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. दरम्यान, पोलिसांच्या कामकाजाबाबतच काही पदाधिकाऱ्यांकडून मध्यंतरी शंका उपस्थित केली गेली होती. कायदा-सुव्यवस्था ढासळी म्हणणाऱ्यांचे ‘रेकॉर्ड’च गंभीर गुन्ह्यांनी भरलेले असल्याचे पोलिसांच्या पडताळणीत आढळून आले आहे.
कोर्टात गुन्हा सिद्ध झाल्यास दोन किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते असे २६ नगरसेवक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आहेत. तर मागील दीड वर्षात भाजप आणि अन्य पक्षाच्या सात नगरसवेकांवर आणि नगरसेविकांच्या पतींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महापालिका कर्मचाऱ्याला खुनाचा प्रयत्न, फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, खंडणी, खुनाचा कट, पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप-हुज्जत घालणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
राजकीय आंदोलन किंवा अन्य प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असणाऱ्यांची संख्या वेगळी असून, ‘समाजासाठी आंदोलन’ करणाऱ्यांचा या रेकॉर्डवरील नगरसवेकांमध्ये समावेश नाही. महापालिका निवडणुकांमध्ये एकूण उमेदवारांपैकी ४४ गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांनी नशिब आजमावले होते. त्यापैकी २६ जण निवडणून आले आहेत. तर अनेकांवर निवडून आल्यानंतर गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांचे संख्याबळ अधिक असून, गुन्हे दाखल असलेल्यांमध्येही भाजपची संख्या अधिक आहे. परंतु, निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या उड्या मारलेल्यांचाही यात समावेश आहे.
———————————————————————
गंभीर गुन्हे दाखल असणारे नगरसेवक
भाजप – १८
राष्ट्रवादी काँग्रेस – ५
शिवसेना – २
मनसे – १
यापैकी नगरसेविका- ३
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button