breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Bhausaheb Bhoir: राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब भोईर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पिंपरी: डाॅक्टरकडून खोटे फीटनेस प्रमाणपत्र घेवून आईचे बनावट मृत्युपत्र तयार करुन चिंचवडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात इतर वारसांच्या मिळकतीची नोंद केली. घरातील इतर वारसाच्या हिश्शातील मिळकत आणि सदनिका बळकावून आर्थिक फसवणुक केल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यासह पाच जणावर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही राजकीय दबावापोटी पोलिस कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी नरेंद्र सुभाष भोईर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी अॅड आतिष लांडगे, अॅड प्रसन्न लोखंडे उपस्थित होते.

अधिक माहिती देताना नरेंद्र सुभाष भोईर (वय ४२, रा. प्लॉट क्र.३, भोईरनगर, चिंचवड) म्हणाले की, आमची फसवणूक केल्याने भाऊसाहेब भोईर यांच्याविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला. मात्र राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. त्यामुळे आम्ही मोरवाडी न्यायालयात दाद मागितली. त्यावर मंगळवारी (दि. २०) सुनावणी झाली. न्यायालयाने चिंचवड पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढत भाऊसाहेब सोपानराव भोईर, आत्या अरुणा महेंद्र आगळे, नितीन कन्हैयालाल भन्साळी, डॉ. रंजीनसिंह माने आणि बाबू म्हेत्रे या पाच जणांवर कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, आयपीसी १२० बी आणि १५६ (३) अनुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश चिंचवड पोलिसांना दिले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे माझे चुलते आहेत.  २००५ मध्ये माझे आजोबा सोपानराव भोईर म्हणजेच भाऊसाहेब भोईर यांच्या वडिलांचे निधन झाले. निधनापूर्वी सोपानराव भोईर यांनी बांधकाम व्यवसायिक बाबु म्हेत्रे यांच्यात एक समजुतीचा करार झाला होता. त्यात चिंचवड येथील रेणुका अविष्कार प्रेमलोक पार्क या इमारतीत पहिल्या मजल्यावरील ८०० चौरस फुटाचा सदनिका, म्हेत्रे यांनी सोपानराव यांना देण्याचे कबुल केले होते. परंतु १० जानेवारी २०२२ रोजी कुठलीही कल्पना न देता भाऊसाहेब भोईर आणि बांधकाम व्यावसायिक म्हेत्रे यांनी संगनमत करुन ती सदनिका वारसदारांना कल्पना न देता, तिचे डीड ऑफ असाइनमेंट तयार करुन भाऊसाहेब भोईर यांनी स्वतःच्या नावे केली.

त्यानंतर माझी आजी इंदुबाई सोपानराव भोईर यांचे १३ जुलै २०२१ रोजी निधन झाले. त्यानंतर देखील भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवडच्या तलाठी कार्यालयात १ डिसेंबर २०२१ रोजी वाटप पत्रानुसार मिळकत आणि सदनिका दिलेल्या नाहीत. त्यांनी बोगस मृत्यूपत्रानूसार स्वत:च्याच नावे करून घेतल्या. तसेच संपूर्ण मिळकतीवर स्वतःचीच नावे लावले. ही बाब २२ ऑगस्ट रोजी तक्रारदाराला समजली. त्यांनी मृत्यूपत्र तपासले असता डॉ. सिंह यांनी आजी इंदुबाई यांना १८ ऑक्टोबर २००५ रोजी तपासले असल्याचा उल्लेख आहे. तर मृत्यूपत्राचा दस्त हा २३ डिसेंबर २००५ रोजीच झाल्याचे नमूद आहे. जे नियमांना धरुन नाही.

यावर नरेंद्र यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला. मात्र, राजकीय दबावापोटी भाऊसाहेब भोईर यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई चिंचवड पोलिसांनी केली नाही. यामुळे नरेंद्र यांनी कलम 156 अंतर्गत मोरवाडी न्यायालयात धाव घेतली. याबाबत न्यायालयात मंगळवारी (दि. २०) सुनावणी झाली. न्यायालयाने चिंचवड पोलिसांवर ताशेरे ओढत वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, हे नमूद करत पोलिसांना गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

दरम्यान, चिंचवड पोलिसानी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पण, संबंधितावर अद्याप कोणतीही कारवाई करत नाही. गुन्हा दाखल केलेल्याना तात्काळ अटक करावी, आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी तक्रारदार नरेंद्र भोईर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button