सौंदर्याची ‘अनफिट’ व्याख्या…कशी सुटका करावी?

अभिनेत्री, वृत्तपत्रातील मोहक चेहरे आणि जाहिरातीतील मॉडेल्स सौंदर्याच्या नव्या व्याख्या निर्माण करतात. तरुणींकडून मग तसंच दिसावं, यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, ‘बॉडी शेमिंग’चे प्रकार वाढले, की ते आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करतात. सामान्य जनताच नाही, तर बॉलिवूडच्या अभिनेत्रीही यामुळे त्रस्त आहेत. काय आहे हा प्रकार आणि यापासून कशी सुटका करावी, याविषयी…
आजकाल मॉडेलिंगच्या व्याख्येचा पहिला शब्द तुमच्या शरीराच्या आकाराशी जोडला जातो. त्यामुळे मॉडेलिंगमधये करिअर करण्यास इच्छुक असलेले आधी वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू करतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीच्या ईशा निगमसोबत घडला. कॉलेजमध्ये दाखल होताच तिचा चेहरा मॉडेलिंगसाठी परफेक्ट असल्याच्या कमेन्ट्स तिला मिळायला लागल्या. तिचं वाढलेलं वजन मात्र याच्या आड येत होतं. मित्रांनी सांगितल्यानंतर पोटाची आणि गालाची चरबी कमी व्हावी, असं तिलाही वाटायला लागलं. यासाठी ती औषधं घेऊ लागली. यासोबतच जेवणानंतर ओकारी करणंही तिनं सुरू केलं. काही दिवस गेल्यावर एके दिवशी ईशाला वारंवार उलट्या झाल्या. ती बेशुद्ध पडली. घरच्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. वस्तुस्थिती कळल्यावर डॉक्टरांनी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे समुपदेशनासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. ईशाचं समुपदेशन सुरू असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
शाळा सुटली, चिडवणं सुटलं नाही
गुंता सुटला आणि अर्पित पुन्हा शाळेत जायला लागला.
हवेत उडून जाशील बारक्या…
‘सोसाट्याचा वारा सुटला की, घरचे लोक गच्चीवर वाळत टाकलेल्या कपड्यांसोबत तुझीही चिंता करत असतील. तू उडून जाऊ नये; म्हणून ते काय करतात? कदाचित तुला दोरानं बांधून ठेवत असतील ना?’ मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा राहुल अतिशय बारीक असल्यामुळे अशा कमेन्ट्सचा त्याला रोजच सामना करावा लागायचा. ऑफिसमध्ये त्याला वेगवेगळ्या नावांनी चिडवलं जायचं. त्याच्यावर जोक्स तयार होऊन ते फॉरवर्ड केले जायचे. यानं राहुल नैराश्यग्रस्त झाला. काही दिवसांनी त्यानं ऑफिसला जाणंही बंद केलं. झोप न येण्याची समस्या त्याच्यासाठी कायमची झाली. यापासून आराम मिळावा; म्हणून त्यानं समुपदेशन सुरू केलं; कारण त्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागले होते.