breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

#Covid-19: देशात एक लाख ३२ हजार ७८८ नवे करोनाबाधित

मुंबई |

गेल्या २४ तासांत देशात १,३२,७८८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २,८३,०७,८३२ वर पोहचली; तर दैनंदिन सकारात्मकता दर ६.५७ टक्क्यांपर्यंत कमी झाला. याच कालावधीत ३२०७ लोक करोनाने मृत्युमुखी पडल्यामुळे करोनामृत्यूंचा आकडा ३.३५,१०२ झाला. सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या २० लाखांहून कमी सक्रिय प्रकरणांची नोंद झाली, असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

मंगळवारी देशात २०,१९,७७३ करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे करोनाचा संसर्ग शोधण्यासाठी देशात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ३५ कोटी ५७ लाखांहून अधिक झाली आहे. याचवेळी, दैनंदिन सकारात्मकता दर ६.५७ टक्के नोंदला गेला. सलग नवव्या दिवशी तो १० टक्क्यांहून कमी राहिला आहे, असेही मंत्रालयाने सांगितले. मरण पावलेल्या ३२०७ जणांपैकी ८५४ महाराष्ट्रातील, ४९० तमिळनाडूतील, ४६४ कर्नाटकातील, १९४ केरळमधील, १७५ उत्तर प्रदेशमधील, १५६७८ पश्चिम बंगालमधील, तर १०४ आंध्र प्रदेशातील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button