breaking-newsराष्ट्रिय
सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महाग

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीनंतर सुरू झालेली पेट्रोल-डिझेल दरवाढ आज तेराव्या दिवशीही कायम आहे. मोदी सरकार चौथ्या वाढदिवशी काहीतरी खूशखबर देईल, अशी आशा बाळगून बसलेल्या जनतेची निराशाच झाली आहे. पेट्रोलच्या दरात आज १३ पैशांची, तर डिझेलमध्ये १६ पैशांची वाढ झाली आहे.
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर ८५.७८ रुपये झाला आहे, तर डिझेल ७३.३९ रुपयांवर पोहोचलंय. वाढत्या इंधनाच्या दरांमुळे जनतेच्या रागाचाही भडका उडण्याचा धसका घेऊन गेल्या दोन-चार दिवसांत केंद्रातील मोदी सरकारनं वेगानंच पावलं उचलल्याचं चित्र दिसत होतं. आज – मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीदिनी आपल्याला ‘काडीचा आधार’ मिळू शकेल, असं सामान्यांना वाटत होतं. परंतु, तसं काही झालेलं नाही.