breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; २ जखमी, १ गंभीर

पुणे |महाईन्यूज|

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ओझर्डे गावाजवळ आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास दूध वाहतूक करणारा पीक अप टेम्पो आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. यात टेम्पोमधील दोघे जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ओझर्डे गावाजवळ आज सकाळी सहा वाजता भीषण अपघात झाला. दूध वाहतूक करणाऱ्या पीक अप टेम्पोनं भरधाव कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. यात टेम्पोचा चालक आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक जण जखमी झाला. चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एक्स्प्रेस वेवरून अपघातग्रस्त वाहन हटवले. त्यामुळं वाहतूक कोंडी झाली नाही. पुण्याकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button