breaking-newsमनोरंजनमुंबई
सनी लिओन खरेदी करणार क्रिकेट टीम?

मुंबई : आयपीएलचा हंगाम नुकताच संपला आहे. पण, आगामी हंगामात या आयपीएलमध्ये आणखी एक नवीन टीम उतरण्याची शक्यता आहे. अभिनेत्री सनी लिओन एका क्रिकेट टीम खरेदी करण्याच्या विचारात आहे.
सनी लिओन आता खेळाच्या मैदानात उतरणार आहे. प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे याचा खुलासा खुद्द सनीने केला आहे. सनीने खरेदी केलेल्या टीमचे नाव आहे चेन्नई स्वेगेर्स. याबद्दल बोलताना सनी म्हणाली की, क्रिकेट पाहणे मला खूप आवडते. त्यामुळे मी त्या खेळाला प्रोत्साहन देऊ इच्छिते. यामुळे मी टीम खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सनीने चेन्नई टीमचे कौतुक केले. सनी म्हणाली की, शानदार कामगिरी करत या टीमने किताब आपल्या नावे केला. चेन्नई स्वगेर्स देखील अशीच कामगिरी करेल, असा विश्वास सनीने दाखवला.