breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रायगडावर 5 व 6 जूनला होणार शिवराज्यभिषेक सोहळा

पिंपरी – अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगड येथे दि. 5 व 6 जूनला 345 वा शिवराज्यभिषेक सोहळा होणार आहे.

खासदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो शिवभक्त जाणार असून यंदा प्रथमच खासदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या संकल्पनेतून सहभागी शिवभक्त रायगड किल्ल्याची साफसफाई करणार आहेत. दि. 5 जूनला अन्नछत्राचे संभाजीराजे यांच्या हस्ते उदघाटन होईल.

सायंकाळी चार वाजता जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश म्हणून वृक्षारोपण करण्यात येणार आहे, त्यानंतर इतिहासकालीन वस्तुचे व शस्त्राच्या प्रदर्शनाचे उदघाटन होईल, रात्री शाहिरांचा कार्यक्रम होईल. दि. 6 जूनला सकाळी सहा वाजता स्वराज्याच्या भगव्या ध्वजाचे आरोहण होईल. रात्री आठ वाजता राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम होईल. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे आगमन होईल. पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो शिवभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button