breaking-newsराष्ट्रिय

‘मोदी म्हणजे सीबीआय, आरबीआय गिळंकृत करणारा अॅनाकोंडा’

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या गोटात आल्यानंतर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगु देशम पक्षाने (टीडीपी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना ‘अॅनाकोंडा’ या अजस्त्र सापाशी केली आहे. मोदी अॅनाकोंडाप्रमाणे राष्ट्रीय संस्थांना गिळंकृत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टीडीपीचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि राज्याचे अर्थमंत्री यनामाला रामकृष्नुदू यांनी मोदींपेक्षा मोठा दुसरा कोणताच अॅनाकोंडा नसल्याचे म्हटले आहे.

ANI

@ANI

Who can be a bigger Anaconda than Narendra Modi? He himself is the Anaconda that has swallowed all the institutions. He is swallowing up institutions like CBI, RBI etc: Andhra Pradesh Finance Minister Yanamala Rama Krishnudu

ANI

@ANI

Every Tom, Dick&Harry is speaking of past politics. Past cant be present or future. But present and future will become past. The critics of TDP should understand this.TDP was not established against any single party. It was founded against system:Andhra FM Yanamala Rama Krishnudu

रामकृष्नुदु म्हणाले की, ते (मोदी) सीबीआय, आरबीआय आणि त्यासारख्या दुसऱ्या संस्थांना गिळंकृत करत आहेत. ते रक्षक कसे असू शकतील, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रदेश भाजपानेही टीडीपीवर पलटवार केला असून एन चंद्राबाबू नायडू हे भ्रष्टाचाराचे राजा असून त्यांच्या भ्रष्टाचारांचा आता खुलासा होईल, असा धमकीवजा इशाराच दिला आहे. सध्या देशाला भाजपापासून वाचवणे हेच टीडीपीचे तत्कालिक कर्तव्य असल्याचे रामकृष्नुदु यांनी स्पष्ट केले आहे.

प्रत्येक टॉम, डिक आणि हॅरी जुन्या राजकारणाबाबत बोलत आहे. सत्य हे आहे की, भूतकाळ वर्तमान किंवा भविष्य असू शकत नाही. पण वर्तमान आणि भविष्य जरुर एक दिवस भूतकाळ बनू शकेल. टीडीपीवर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, टीडीपी कोणत्या एका पक्षाविरोधात कधीच नव्हती. उलट हा पक्ष व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिला होता.

सध्याच्या परिस्थितीत देश, लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांना वाचवण्याची प्राथमिक जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे सांगत त्यांनी विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस आणि जन सेनावर निशाणा साधला. हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी हपापले असून त्यांना राष्ट्रीय जबाबदारीचे कोणतेही सोयरसूतक नाही. त्यामुळेच हे दोन्ही पक्ष मोदींचे समर्थन करत आहेत. मोदी राष्ट्रीय संस्था आणि लोकशाही उद्धवस्त करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे, प्रदेश भाजपा अध्यक्ष कन्ना लक्ष्मीनारायण म्हणाले की, एन चंद्राबाबू नायडू भ्रष्टाचाराचे बादशाह आहेत. त्यासाठी ते कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. जी व्यक्ती मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे असा प्रस्ताव २०१७ मध्ये एनडीएच्या बैठकीत सादर करते. तीच व्यक्ती आज मोदींना दोषी म्हणून सांगत आहे, किती विरोधाभास आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button