breaking-newsराष्ट्रिय

मेट्रोचा ट्रॅक ओलांडणारा तरुण थोडक्यात बचावला !

नवी दिल्ली : रुळावर उतरुन प्लॅटफॉर्म बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. दिल्लीतील शास्त्रीनगर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली. मेट्रोच्या पायलटने वेळीच ब्रेक दाबल्याने 21 वर्षीय तरुण मयूर पटेलचे प्राण वाचले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

मयूर पटेलने रेल्वे स्टेशनप्रमाणेच मेट्रो ट्रेनचाही रुळ ओलांडला. पण दुसऱ्या बाजूच्या फ्लॅटफॉर्मवर मेट्रो निघण्याची वेळ झाली होती. मयूर रुळ ओलांडून दुसऱ्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर जाणार इतक्यात मेट्रो सुरु झाली. पण ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने मेट्रो थांबवली आणि अपघात टळला. मेट्रो कर्मचाऱ्यांनी मयूर पटेलची चौकशी केली असता तो म्हणाला की, एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या फ्लॅटफॉर्मवर कसे जायचे हे मला माहित नव्हते. त्यामुळे रुळावर उतरुन प्लॅटफॉर्म बदलण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून दंड वसून करुन सोडण्यात आले.

मेट्रो ट्रॅकवर उतरणे किंवा चालणे हा दंडनीय गुन्हा आहे. या प्रकरणी दोषी व्यक्तीकडून दंड वसूल केला जातो. तसेच सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. मध्ये सरकते जिन्यांची सोय असतानाही लोक अशा पद्दतीने रुळ का ओलांडतात, हा प्रश्न समजण्यापलीकडचा आहे. जलद आणि सोप्या प्रवासासाठी देशातील विविध शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प सुरु होत आहेत. बुलेट ट्रेनची स्वप्नही आपण पाहत आहोत. मात्र भारतीयांच्या सवयी काही बदलण्याचे नाव घेत नाहीत, हेच या घटनेतून समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button