breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रमझानसाठी नियमावली जाहीर इफ्तारसाठी 100 जणांना परवानगी

नवी दिल्ली– कोरोनामुळे यावेळीही रमझानसाठी काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार इफ्तारसाठी 100 जणांना परवानगी आहे. मशिदीत मोजक्या लोकांना प्रवेश दिला जाणार असून तेथे मास्क आणि सोशल डिस्टन्स व कोरोनाच्या इतर नियमांचे पालन बंधनकारक आहे, असे इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने म्हटले आहे. महाराष्ट्रातही रमझानच्या काळात सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर-ए-खतीब हाफिस हिसामुद्दिन अश्ररफी यांनी केले आहे.

रमझानच्या पवित्र मासात प्रत्येक मुस्लिमाला उपवासाचा अधिकार आहे. तेव्हा त्याने तो केला पाहिजे. परंतु त्याबरोबरच सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे सरकारच्या नियमांचेही पालन केले पाहिजे. रात्रीची संचारबंदी असलेल्या ठिकाणी नमाजीनी संचारबंदी सुरू होण्यापूर्वी घरी परतले पाहिजे. 100 पेक्षा अधिक जणांनी मशिदीत आणि इफ्तारला जमू नये. सहेरीसाठी लाऊडस्पीकरचा वापर करू नये. नमाज पढताना मशिदीत सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरणे गरजेचे आहे. याशिवाय सॅनिटायझर आणि इतर नियमांचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button