मारहाण प्रकरणी दोन अल्पवयीन मुले ताब्यात

पुणे- येरवडा येतील आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी सिध्दार्थ बनसोडे(21,रा.धानोरी) यांनी महाविद्यालयाच्या मैदानावर नेहमी खेळणाऱ्या मुलांपैकी दोन अनोळखी मुलांना ऍक्टव्हा गाडी ओढत नेताना बघितले. त्यांनी गाडी का ओढत नेता असा जाब त्यांना विचारला. याचा राग येऊन दोन्ही अल्पवयीन मुलांनी त्यांच्या दहा ते बारा साथीदारांच्या मदतीने शिवीगाळ व मारहाण केली. यातील एकाने हातातील चाकुने डावे कानाजवळ मारले तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने , लाखडी बॅटने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीला वाचवण्यासाठी महाविद्यालयाचा शिपाई दिलीप फडके व असवरे सर धावून आले. मात्र त्यांनाही टोळक्याने मारहाण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मारोडे तपास करत आहेत.