breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

राज्यात कोरोनाची लागण आता सामान्य नागरिक ते नगरसेवक, आमदार, नेते यांना देखील होण्यास सुरुवात झाली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे १ जुलै ते ४ जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यावर त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली होती…अखेर अमोल कोल्हे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

अमोल कोल्हे यांनी स्वत: ट्विट करत म्हटलं आहे की, “माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना. अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत”.

“त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालयामध्ये संपर्क करू शकता”, असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button