Views:
230
लंडन – भारतीय बॅंकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या विजय माल्ल्याला भारत सोडावा लागल्याबद्दल अजिबात खंत वाटत नाही. ब्रिटनमध्ये विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पण खटल्याची सुनावणी सुरु असताना माल्ल्या मात्र ऐषो आरामी आयुष्य जगत आहे. भारताने ब्रिटनकडे विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. विजय माल्ल्याला सुनावणीसाठी कोर्टात हजर रहावे लागते, त्याच्या प्रवासावर काही निर्बंध आहेत तरी, माल्ल्या ब्रिटनमध्ये सोशल लाईफ आनंदात जगत आहे.
क्रिकेटच्या मॅचपासून ते घोडयांच्या शर्यतीपर्यंत माल्ल्याची ब्रिटनमध्ये प्रत्येक ठिकाणी उपस्थिती असते. बुधवारी माल्ल्या लंडनमध्ये फॉर्म्युला वनच्या एका कार्यक्रमाला हजर होता. त्यावेळी माल्ल्याला तुम्हाला भारताची आठवण येते का ? असा प्रश्न विचारला त्यावर त्याने आठवण्यासारखे काही नाही असे उत्तर दिले.
माझे सर्व कुटुंबिय इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये रहतात. माझ्या सावत्र भावंडांबद्दल म्हणाला तर त्यांच्याकडे यूकेचे नागरीकत्व आहे. त्यामुळे भारतामध्ये मिस करण्यासारखे फारसे काही नाही असे उत्तर त्याने दिले. विजय माल्ल्यावर भारतीय बॅंकांचे हजारो कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. किंगफिशर एअरलाईन्स या कंपनीसाठी त्याने हे कर्ज घेतले होते. पण माल्ल्याने त्याच्यावरचे हे आरोप फेटाळून लावलेत.
Like this:
Like Loading...