breaking-newsमनोरंजन

भावेश जोशीसाठी बॉलिवूडचा सपोर्ट

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरचा “भावेश जोशी सुपरहिरो’ अखेर या शुक्रवारी रिलीज झाला. हर्षवर्धनसाठी हा सिनेमा खूपच महत्वाचा आहे. वॉटर माफिया आणि एका युवकाच्या संघर्षावर हा सिनेमा आधारलेला आहे. त्याची ही दुसरी फिल्म आहे.

यापूर्वी राकेश ओमप्रकाश मेहराच्या “मिर्झ्या’मधून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र बॉक्‍स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल आपटला होता. आता “भावेश जोशी…’वर हर्षवर्धनच्या करिअरची मदार अवलंबून आहे. विशेषतः सोनम कपूरचा भाऊ आणि अनिल कपूरचा मुलगा म्हणून तरी त्याचा हा सिनेमा यशस्वी होणे गरजेचे आहे. त्याच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळण्याच्या खूप आधीपासून अख्ख्या बॉलिवूडने हर्षवर्धनसाठी या सिनेमाला सपोर्ट करायला सुरुवात केली आहे.

सलमान खानने तर आगोदरच या सिनेमाला आपला सपोर्ट जाहीर केला आहे. आता आमिर खाननेही ट्‌विटरवरून हर्षवर्धनला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाणी फौंडेशनच्या माध्यमातून विधायक काम करत असलेल्या आमिर खानला पाणी वाचवण्याचे काम सिनेमात दाखवले गेल्याचा विशेष आनंद होतो आहे. गंमत अशी की “भावेश जोशी…’चा सामना सोनम कपूरच्या “वीरे दी वेडिंग’शी होतो आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button