भारतीय रेल्वेला मिळाले सर्वात सुसाट धावणारे इंजन

चितरंजन लोकोमोटिव वर्क्सने (CLW) भारतीय रेल्वेला आता पर्यंतचे सर्वात वेगवान इंजिन दिले आहे. या इंजिनाच्या क्षमतेबाबत शक्यता दर्शवली जात आहे की, हे इंजन 200 किमी प्रति तास या गतीने धावू शकणार आहे. तसेच WAP 5 मोडिफाइड इंजनमध्ये ड्राइवरच्या कंफर्ट आणि सुरक्षा देखील काळजी घेतली जाईल.
पहिले इंजन गाझियाबाद येथे पाठवण्यात आले असून त्याचा वापर राजधानी एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेस या रेल्वेमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. WAP 5 मोडिफाइड इंजनमुळे ट्रेनचा प्रवास अधिक गतिमान होणार असून त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. CLW च्या जनसंपर्क अधिकारी मंतर सिंह यांनी सांगितले की, इंजनला अशा प्रकारे तयार केले गेले की 200 किमी प्रति तासाच्या वेग असतांना सुद्धा ट्रेनमध्ये वाइब्रेशन जाणवणार नाही. तसेच बुगी स्टेबल असणार आहे. यामध्ये सीसीटीवी कॅमेरा आणि कॉकपिट वॉयस रिकॉर्डर लावल्या जाणार आहे जे ड्राइवर सोबत केलेला संवाद 90 दिवस राखीव ठेवू शकणार आहे तसेच इंजनमध्ये विजेचा उपयोग देखील कमी प्रमाणात होणार आहे