breaking-newsक्रिडा

फेडररला पराभूत करत जोकोविच अंतिम फेरीत दाखल

  • उपान्त्य फेरीतील पराभवामुळे फेडरर विक्रमापासून वंचित

पॅरिस- सार्वकालीन महान टेनिसपटू रॉजर फेडरर याला शनिवारी पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या उपान्त्यफेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याला नोवाक जोकोविच याने तीन तास चाललेल्या सामन्यात 7-6 (8-6), 5-7, 7-6 (7-3) असे टायब्रेकरमध्ये पराभूत केले. मात्र, या पराभवामुळे आपल्या 100व्या विजेतेपदापासून फेडरर केवळ एक पाऊल दूर असताना पराभूत झाला आहे. आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात जोकोविच याची लढत रशियाच्या कारेन खचानोव्ह याच्याशी होणार आहे.

तीन वर्षांनंतर पॅरिस मास्टर्स स्पर्धेत सहभाग घेणारा फेडरर प्रतिक्रिया देताना म्हणाला, जोकोविचचा खेळ खूपच चांगला झाला. शेवटी त्याच्याकडूनही चुका झाल्या. परंतु, त्याचा मी फायदा उठवू शकलो नाही. एकंदरीत माझ्या खेळाबद्दल मी समाधानी आहे. मागील आठवड्यात बासेल्समध्ये झालेल्या स्पर्धेत मी विजेतेपद पटकाविले होते. त्या स्पर्धेपेक्षा मी यावेळी चांगला खेळ केला. जोकोविच सारखा एखादा कणखर प्रतिस्पर्धीच मला पराभूत करू शकला असता. फेडरर पुढे बोलताना म्हणाला, जे झाले ते झाले. मी सध्या आराम करणार आहे आणि त्याचबरोबर 11 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या एटीपी फायनल्स स्पर्धेची तयारी करणार आहे. पाच वेळा पॅरिस मास्टर्स स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविच ही स्पर्धा जिंकून राफेल नादालच्या 33 मास्टर्स विजेतेपदाची बरोबरी करू शकतो.

जोकोविच आणि फेडरर यांच्यात झालेल्या एकूण सामन्यांमध्ये जोकोविचने जास्त सामन्यात विजय मिळवत 25- 22 अशी आघाडी घेतलेली आहे. 2015 पासून त्याने फेडरर विरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. दुखापतींमुळे मागील काही स्पर्धांमधून माघार घेतल्याचा फटका राफेल नादालला बसला आहे. यावर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकणारा जोकोविच पॅरिस मास्टर्स स्पर्धा संपल्यावर मंगळवारी मानांकन यादीत पहिल्या स्थानावर विराजमान होणार आहे.

तत्पूर्वी, रशियाच्या 22 वर्षीय खचानोव्ह याने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएम याचा 6-4, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव करत कारकिर्दीत प्रथम एखाद्या मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या डोमिनेक थेमला साहवे मानांकन देण्यात आले होते. विजयानंतर खचानोव्ह म्हणाला, मी खूप आनंदी आहे. परंतु, ही स्पर्धंगा संपलेली नाही. मला माझी विजयी लय कायम ठेवत ही स्पर्धा जिंकायची आहे.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या खचानोव्हचा खेळ मानांकन यादीत पहिल्या 10 खेळाडूं असणाऱ्या खेळाडूंविरुद्ध बहरत नव्हता. त्याने टॉप खेळाडूंसोबत खेळल्या 19 सामन्यात फक्त 3 विजय मिळवले आहेत. परंतु, त्याने या स्पर्धेत जागतिक मानांकान यादीत 8 व्या स्थानावर असणाऱ्या डोमिनेक थेम याचा 71 मिनिटातच फडशा पडला. तर त्याच्या अगोदर जॉन इसनेर (9) आणि आलेकझान्डर झुआरेज (5) यांना गारद केले आहे. ही स्पर्धा संपल्यावर खचानोव्हच्या मानांकन यादीत सुधारणा होऊन तो 12 व्या स्थानापर्यंत पोहचू शकतो. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो जोकोविचला पराभूत करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button