breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

….तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार, खुर्चीचा मोह नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

मुंबई : बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी मला सांगावं. मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलंय. मला कोणताही मोह नाही, असा निरोपच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपसोबत जाण्याचा कोणताच विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नि:क्षून सांगितलं.

गेल्या ४८ तासांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडावरही त्यांनी सेना स्टाईलने आपली भूमिका मांडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं असतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठीक आहे. पण मला दु:ख झालं की माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको… आता काय बोलावं….सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्रिपदी नको, मला तोंडावर सांगा, मी आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले??

धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ पवारांचा विश्वास. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.

कुऱ्हाडीची गोष्ट. ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी.

एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button