breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विद्यापीठ आशिया खंडात १०९ व्या स्थानावर

पुणे – टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग संस्थेकडून जगभरातील विद्यापीठांची गुणांकने जाहीर करण्यात असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आशिया खंडात १०९ वा क्रमांक पटकाविला आहे, तर जागतिकस्तरावर ते ५०१ ते ६०० या गटात ते समाविष्ट झाले आहे. याशिवाय नव्याने विकसित होत देशांमध्ये (एमर्जिंग इकॉनॉमिज) विद्यापीठाने ९३ वा क्रमांक पटकावला आहे.

भारतातील विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ संयुक्तपणे सहावा क्रमांकांवर आहे. पहिल्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (बंगळुरू), दुसऱ्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंदूर), तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (रूरकी) आणि जेएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च (मैसूर) या संस्था आहेत. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी (दिल्ली), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कानपूर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (खरगपूर) या संस्थांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी पुणे विद्यापीठ आशिया खंडातून १८८ व्या स्थानावर होते. तेथून काही क्रमांकामध्ये सुधारणा करीत १०९ व्या स्थानावर ते पोहचले आहे.

या गुणांकनात संयुक्तपणे दहाव्या स्थानावर पुढील उच्चशिक्षण संस्था व विद्यापीठांचा समावेश आहे : अमृता विश्व विद्यालय (कोईमतूर), बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणसी), दिल्ली विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च (पुणे), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (गुवाहटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (चेन्नई), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (भुवनेश्वर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (हैदराबाद), जादवपूर विद्यापीठ (कोलकाता), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (रूरकी), पंजाब विद्यापीठ (चंदीगढ), तेजपूर विद्यापीठ (तेजपूर).

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button