पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव उत्साहात

पिंपरी – सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित केलेल्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव नुकताच उत्साहात झाला. तीन दिवस चाललेल्या महोत्सवात राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तबलावादन व कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन झाले.
युवा कलाकार कुमार सुजल गांधी, प्रमोद गणोरकर, नामदेव शिंदे तसेच पं. रघुनंदन पणशीकर, पं. श्रीनिवास जोशी, पं. नरेशकुमार मल्होत्रा, कविता खरवंडीकर, पं. सुधाकर चव्हाण यांचे गायन, सतारवादक उस्ताद रफीक खॉं व उस्ताद शफीक खॉं यांनी सतार जुगलबंदी, अवनी गद्रे व शिवानी गद्रे यांच्या कथ्थकने महोत्सवाची सांगता झाली. पं. विवेक सोनार यांचे बासरीवादन, पं. प्रभाकर पांडव, मिलिंद कुलकर्णी, देवेंद्र देशपांडे व गंगाधर शिंदे यांनी हार्मोनिअमची संगत केली. तबल्याची संगत पं. माधव मोडक, नीलेश रणदिवे, नंदकिशोर ढोरे, रमाकांत राऊत, प्रफुल्ल काळे, अतुल कांबळे, विष्णू गलांडे व दशरथ राठोड यांनी केली. पखवाज साथ गंभीर महाराज अवचार यांनी केली.