breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 | IPL सिझन पुढील आदेशापर्यंत रद्द – सौरभ गांगुली

नवी दिल्ली | आयपीएलचा यंदा होणारा 13 वा सिझन पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आला आहे. BCCI अध्यक्ष सौरभ गांगुलीने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, टूर्नामेंट तुर्तास रद्द करण्यात आली आहे. येणाऱ्या दोन महिन्यानंतरच आता 13 व्या सिझनच्या आयोजनाबाबत निर्णय होईल. आयपीएल 13 ची सुरुवात 29 मार्चपासून होणार होती.

मात्र कोरोना संकटामुळे ही तारिख पुढे ढकलत 15 एप्रिल केली होती. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन वाढल्यानंतर पुढील आदेशापर्यंत आयपीएल रद्द करण्याबाबत माहिती सौरभ गांगुलीने दिली. याबाबत गांगुलीने सांगितलं की, सरकारने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळं आयपीएल तुर्तास स्थगित केलं आहे. देशातील सद्य स्थिती पाहता बीसीसीआयजवळ आयपीएलचे आयोजन करण्यासंदर्भात खूप कमी पर्याय आहेत. यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास पुढील वर्षात आयपीएलचा लिलाव पार पडला जाणार नाही अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button