breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांचा पैसा वापरला

पुणे – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  एल्गार परिषदेच्या या आयोजनात नक्षलवाद्यांचा सहभाग होता. एल्गार परिषदेच्या या कार्यक्रमाला नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला आहे.  काल सुधिर ढवळेसह पाच जणांना अटक केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता  सुनावणी कोर्टात सुनावणी झाली आहे. इतर चार जणांना तीन वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आदि सहभागी झाले होते.  या एल्गार परिषदेच्या सुरुवातीला कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या गीतातून लोकांना चेतवल्याचा आरोप करण्यात आला.  याप्रकरणी 8 जानेवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या एल्गार परिषदेनंतर दुस-या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली ही दंगल घडवून आणण्यात नक्षलवाद्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button