breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक, राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची गवर्निंग काउंसिलची तिसरी बैठक सुरु आहे. या बैठकात नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया देशात जलद विकासासाठी एक रोडमॅप सादर करणार आहेत.
नीती आयोगाच्या या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी झाले आहेत. पनगढिया यांच्या रोडमॅपमध्ये १५ वर्षाच्या विजन डॉक्युमेंटचे प्रमुख बिंदु असणार आहेत. या शिवाय ७ वर्षाच्या स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट आणि 3 वर्षाचा अॅक्शन प्लान देखील सादर होणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीला अनुपस्थित होते. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया बैठकीत सहभागी झाले आहेत.
– मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होईल याबाबत प्रेजेंटेशन करणार आहेत.