नीरव मोदीला हवाय लंडन मध्ये राजकीय आश्रय

लंडन – पंजाब नॅशनल बॅंकेला तब्बल 14 हजार कोटी रूपयांना फसवून फरार झालेला नीरव मोदी याने लंडन मध्ये राजकीय आश्रय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच तो लंडनमध्ये पळून आला आहे असे सांगण्यात येत आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसी याची भारतात ईडी कडून चौकशी सुरू असून त्या दोघांनाही या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहेत. त्या दोघांचेही पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.
तथापी त्याने आता लंडन मध्ये राजकीय आश्रय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केली असल्याची बातमी येथील एका वृत्तपत्राने दिली आहे. या वृत्तात ब्रिटनच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याची मुलाखतही छापण्यात आली असून त्यात त्याने या वृत्ताला काही प्रमाणात दुजोरा दिला आहे. तथापी त्याने यात म्हटले आहे की अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रकरणामुळे भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये नाहक तणावाची स्थिती निर्माण होते.