breaking-newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडी
धोनी यांचा पद्मभूषण सन्मानाने गौरव
दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विश्वविजेता स्नूकरपटू पंकज अडवाणी यांना सोमवारी नवी दिल्लीत पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आले. या वेळी धोनीने लेफ्टनंट कर्नलचा पोशाख घातला होता. धोनीने बरोबर सात वर्षांपूर्वी २ एप्रिलला भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या विजयाच्या सातव्या वर्धापनदिनी त्याला येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण सन्मान देण्यात आला.