breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सीए होण्यासाठीच्या फाउंडेशन परीक्षा रद्द…विद्यार्थ्यांना आता द्यावी लागणार प्रवेशपरीक्षा…

कंपनी सचिव म्हणजेच सीए होण्यासाठीच्या प्रक्रियेतील फाउंडेशन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या ऐवजी विद्यार्थ्यांना आता प्रवेशपरीक्षा द्यावी लागणार आहे. ‘सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट’ उत्तीर्ण होणारे विद्यार्थीच ‘एक्झिक्युटिव्ह’ अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहेत.

‘दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएसआय) कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम घेण्यात येतो. यापूर्वीच्या रचनेनुसार पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांना एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमाला थेट प्रवेश देण्यात येत होता. मात्र, आता त्यांनाही प्रवेश परिक्षा  उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. बारावी झालेले विद्यार्थीही प्रवेशपरीक्षा देऊ शकणार आहेत. प्रवेशपरीक्षेनंतर एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल हे दोन्ही टप्पे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्यास पदवी मिळेपर्यंत विद्यार्थी कंपनी सचिव बनू शकतील. यातून सीएस फाउंडेशन अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र, ‘आयसीएआय’चा सीए अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व आयसीएमएआयचा कॉस्ट अकाउंटंट अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये सवलत शुल्क भरून या प्रवेशपरीक्षेतून सूट मिळू शकणार आहे.


नव्या रचनेत बिझनेस कम्युनिकेशन, लीगल अ‍ॅप्टिट्यूड अँड लॉजिकल रिझनिंग, इकॉनॉमिक अँड बिझिनेस एन्व्हार्यनमेंट, करंट अफेअर्स, प्रेझेंटेशन्स अँड कम्युनिकेशन अशा चार विषयांचा समावेश असेल. चार विषयांमध्ये प्रत्येकी ४० गुण आणि एकूण ५० टक्के मिळालेले विद्यार्थी एक्झिक्युटिव्ह परीक्षेस पात्र ठरतील. लेखी आणि तोंडी अशी दोन्ही स्वरुपात परीक्षा असेल. लेखी परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असून त्यासाठी दोन तासांचा कालावधी असेल. तोंडी परीक्षेसाठी १५ मिनिटांचा वेळ असेल. या परीक्षा पद्धतीत निगेटिव्ह मार्किंग पद्धती नसेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button