दिवंगत महापौर भिकू वाघेरे यांना महापालिकेतर्फे अभिवादन

पिंपरी – महापालिकेच्या वतीने दिवंगत महापौर भिकू वाघेरे (पाटील) यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आला.
पिंपरीगांवात आज बुधवारी (दि. 6) झालेल्या कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसदस्य योगेश बहल, विठठल ऊर्फ नाना काटे, भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या सुमन पवळे, उषा वाघेरे, निकीता कदम, माई काटे, उषा काळे, स्विकृत सदस्य नरहरी तापकीर, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्य रंगनाथ कुदळे, निलेश पांढारकर, माजी शिक्षणमंडळ सभापती फजल शेख, विजय लोखंडे, हनुमंत नेवाळे, माजी नगरसदस्या शकुंतला भाट, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, माहिती व जनसंपर्कचे प्र. प्रशासन अधिकारी रमेश भोसले, ह.भ.प माऊली महाराज वाळुंजकर, चंद्रकांत गव्हाणे, कामगारनेते शिवाजीराव तापकीर, शिवाजीराव वाघेरे, सदाशिव नाणेकर, प्रा.संपतराव जगताप, उदयोजक महेश जाचक, प्रकाश सोमवंशी, शंकरराव वाघेरे, गुलाबराव सोनवणे, गुलाबराव वाघेरे, बबनराव खराडे, बाळासाहेब वाघेरे, वाल्मिक कुटे, तसेच मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन अभिजीत वाघेरे यांनी केले.