breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हल्लाबोल सांगता सभेला पिंपरी चिंचवडमधून दहा हजार कार्यकर्ते-पदाधिकारी जाणार

पिंपरी –  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्यातील 10 जूनच्या मेळाव्याला उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधून राष्ट्रवादी पक्षाचे दहा हजार कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार आहेत. पक्षाचा स्थापना दिन व पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल’ची सांगता यानिमित्त हा मेळावा होत आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत मेळाव्याचीच लगीनघाई सुरु आहे. त्याच्या नियोजनाचे सध्या शहरात बैठक सत्र येथील पक्ष कार्यालयात सुरु आहे. जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. दोनशे बस त्याकरिता जाणार आहे. प्रत्येक नगरसेवकाला एक बस नेण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यासह वीस सेलचे प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनाही हेच लक्ष्य आहे. सायंकाळी पाचची वेळ मेळाव्याची आहे. मात्र, दुपारी तीन वाजताच पिंपरीतून कार्यकर्त्यांची वाहने पुण्याला रवाना होणार आहेत. प्रत्येक वाहनाची जबाबदारी त्या-त्या पदाधिकाऱ्यावर निश्चीत करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button