Views:
320
पुणे : पीएमपीएमएलच्या भाड्याच्या बसना ब्रेकडाऊन झाल्यास 5 हजारांच्या दंडाचा निर्णय पीएमपीचे नवे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंनी घेतला होता. पहिल्याच दिवशी पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये 35 टक्क्यांची विक्रमी घट झाली आहे.
पीएमपी आणि भाड्याच्या बसपैकी दरदिवशी प्रत्येकी 150 म्हणजेच एकूण प्रतिदिन 300 ब्रेकडाऊन पहिल्याच दिवशी 197 वर आले आहेत. काल रविवारी खात्याचे 105 व भाड्याच्या बसचे 92 असे एकूण फक्त 197 ब्रेकडाऊन नोंदवण्यात आले आहेत.
नवी मुंबईचे माजी आयुक्त तुकाराम मुंढेंनी पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान होताच धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला. यात कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसोबतच भाड्याच्या बसवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता.
Like this:
Like Loading...