breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: सिंहगड पर्यटकांसाठी आजपासून बंद
पुणे | महाईन्यूज
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महत्वाची मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली आहे. तसेच महत्वाच्या यात्रा, उत्सव देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर पर्यटकांचे आकर्षण असलेला सिंहगड किल्ला देखील आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे.
जगभरात कोरोनाने असंख्य बळी घेतले आहे. देखील वाढतो आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वप्रथम रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून तातडीने काळजी व जनजागृती कार्यवाही करण्यात येत आहे. साहाय्यक वनसंरक्षक संजय कडू म्हणाले, सिंहगडावर अनेक जण पर्यटनासाठी येत असतात. परंतु, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा आला आहे.