breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

डॉक्टरांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता

मुंबई : जे.जे. रुग्णालयामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी सुरू केलेले अत्यावश्यक सेवांमधील ‘काम बंद’ आंदोलन सुरु आहे. सोमवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. जोपर्यंत या मागण्यांची पूर्तता रुग्णलयात प्रत्यक्षात होत नाही, तोपर्यंत हा संप सुरु राहणार आहे. आज निवासी डॉक्टर प्रतिनिधी सुरक्षेबाबत मागण्याची पूर्तता प्रत्यक्षात केली जाते का याचा आढावा घेऊन संप मागे घेण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.

दरम्यान, सोमवारी केईएम आणि नायर रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनीही काळ्या फिती लावून काम करत या घटनेचा निषेध नोंदवला. त्यामुळे जे.जे. आणि टिळक रुग्णालयांतील रोजच्या रुग्णसेवेला फटका बसत असून, अनेक रुग्णांना उपचाराविना माघारी परतावे लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button