breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
‘जेट’ अखेर जमीनीवर; डीजीसीआयच्या कारवाईनंतर प्रवाशांचा खोळंबा

तांत्रिक बाबींवरुन जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डायरेक्टोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजेंस अॅण्ड स्टॅटिस्टिक्सने (डीजीसीआय) रोखली आहेत. त्यामुळे काल रात्रीपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.
जेट एअरवेज ही विमान कंपनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चणचणीच्या गर्तेत अडकली आहे. त्यामुळे कंपनीला डीजीसीआयने तांत्रिक मुद्द्यांवरुन विमान उड्डाणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे काल (गुरुवार) रात्रीपासून जेटची आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाली आहे. त्यातच उड्डाणांबाबत या प्रवाशांना जेटच्या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने ते वैतागले आहेत. एबीपीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.