breaking-newsमहाराष्ट्र
औरंगाबादमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त, तलवारी मागवल्या होत्या ऑनलाइन

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गुप्ती, तलवारी, चाकू सारख्या धारदार शस्त्रांची ऑनलाईन शॉपिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फ्लिपकार्टद्वारे शस्त्र मागवणाऱ्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबादच्या क्राईम ब्रँच पथकाने काल रात्री इस्टाकोर्ट सर्व्हिस प्रा. लि. या कुरिअर कंपनीच्या नागेश्वरवाडी आणि सिडोको भागातील गोदामावर छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी १२ तलवारी, १३ चाकू, एक गुप्ती, एक कुकरी अशी शस्त्रं जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी नावेद खान, सागर पाडसवान, चंदू लाखुलकर, मुकेश पाचवणे यांना ताब्यात घेतलं आहे. आणखी तिघांचा शोध सुरु आहे.