breaking-newsपुणेमहाराष्ट्र

महाराष्ट्र बंद : दारू विक्री केंद्रे, परमिट रूम बंद ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सकल मराठा समाजा’ने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी खबरदारी म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व परमीट रूम, देशी-विदेशी दारु विक्री केंद्रे, ताडी विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही सर्व दुकानं बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम १९४९ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील शाळा आणि महाविद्यालयं आज बंद असतील हे कालच जाहीर करण्यात आलं आहे. तर, कोणतेही गालबोट न लावता, शांततेत बंद यशस्वी करुया, असे आवाहन मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button