breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नही; मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला

वसई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसई-विरारमध्ये जाऊन बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि ठाकूर घराणाऱ्यावर हल्लाबोल केला. इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नही. हम शेर है, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकूर घरण्यावर हल्ला चढवला.

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्त मुख्यमंत्र्यांची नालासोपाऱ्याच सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हितेंद्र ठाकूर यांच्या स्थानिक राजकारणासह शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. यावेळी भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाकूर घराण्यावर थेट हल्ला चढवला. मुख्यमंत्री म्हणाले, “मी इकडे येत होतो, तेव्हा मला कोणीतरी विचारलं, देवेनभय्या कुठे निघालात? त्यावेळी मी सांगितले सभेसाठी वसई-नालासोपाऱ्याला निघालोय. मग मला सांगण्यात आलं त्या भागात, त्या इलाक्यात का जाताय? तो परिसर, तो इलाका तर ‘शिट्टी’चा आहे. मी सांगितलं, अरे इलाका तर कुत्र्या-मांजरीचा असतो, आम्ही तर वाघ आहे. वाघ जंगलाचा राजा असतो. त्याच्यासाठी कोणताच इलाका नसतो, पूर्ण जंगलच त्याचा इलाका असतो. वाघ जिथे जाईल तो भाग त्याचा होतो”.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button