breaking-newsपुणेमहाराष्ट्र
आला रे आला…मान्सून आला !!! मान्सून महाराष्ट्रात दाखल – हवामान विभाग

पुणे : ज्या बातमीची संपूर्ण महाराष्ट्र भर खूप आतुरतेने वाट पाहिली जात होती, ती बातमी आली असून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. तळकोकणात मान्सूनचं आगमन झालं आहे. हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. या बातमीमुळे महाराष्ट्रातील सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.