breaking-newsताज्या घडामोडीपुणे
‘आम आदमी पार्टी’चा मोहन जोशींना पाठिंबा !

पुणे – कॉंग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. मोहन जोशी यांना आज “आम आदमी पार्टी, महाराष्ट्र” यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. एका पत्रकाव्दारे आम आदमी पार्टीने हे स्पष्ट केले आहे.
मोहन जोशी यांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी लढत आहे. आपने पाठिंबा दिल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना ग्रासणा-या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि पक्का पुणेकर म्हणून असलेल्या माझ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यानुभव लक्षात घेता, पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील, असा आत्मविश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला आहे.