आकुर्डीत शनिवारी ‘पीसीएमसी’ हेल्थकेअरचे उद्घाटन
पिंपरी – सर्वोच्च गुणवत्ता व्यापक आरोग्य सेवा माफक दरात प्रदान करण्यासाठी आकुर्डीत सुसज्ज असे ‘पीसीएमसी’ हेल्थकेअर सज्ज झाले आहे. या हेल्थकेअरचे उद्या (शनिवारी) नामवंत पाहुण्यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. या रुग्णालयात सर्व सेवा उपलब्ध असणार असल्याची माहिती, डॉ. विलास जोशी व डॉ. रुपाली खर्चे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. विलास जोशी व डॉ. रुपाली खर्चे यांनी सांगितले की, ‘पीसीएमसी’ हेल्थकेअर मध्ये सर्व आरोग्य सुविधा असणार आहेत. प्राथमिक आरोग्य तपासण्या, पॅथालॉजी, एक्स-रे, ईसीजी, लंग तपासणी यासह विविध माफक दरात दिल्या केल्या जाणार आहेत. हेल्थ सेंटर सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा या वेळेत खुले राहणार असून दर रविवारी बंद असणार आहे.
आगामी काळात महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये अल्प दरात उपचार केले जाणार आहेत. मुंबई-पुणे महामार्गावरील आकुर्डी, तपस्वी प्लाझा येथे सुरु होणा-या या हेल्थ सेंटरचे उद्घाटन शनिवारी सामाजिक कार्यकर्ते, उच्चपदस्थ अधिकारी, नामांकित डॉक्टर, आयएएमचे सदस्य यांच्या उपस्थितीत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.