अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांचे 1925 खोटे दावे – मीडियाने दिला हिशोब

लॉस अँजेलिस (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना खोटे दावे करण्याची सवयच आहे. 20 जानेवारी 2017 रोजी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून 1 जुलैपर्यंत त्यानी 1,925 खोटे दावे केले आहेत. असे सांगण्यात आले असून या खोट्या दाव्यांवा हिशोबच देण्यात आलेला आहे.
कॅनडातील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने अध्यक्ष बनल्यापासून डोनॉल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक शब्दाचा हिशोब ठेवलेला आहे. त्याचा तपशील- भाषणांतून ते 648 वेऴा खोटे बोललेले आहेत. आपल्या मुलाखतींमध्ये 380 वेळा, अनौपचारीक निवेदनांमधून 369 वेळा, ट्विटरवर 330 वेळा आणि प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये 192 वेळा ट्रम्प खोटे बोललेले आहेत. या शिवाय सहा वेळा अन्य खोटे दावे डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याचा उल्लेख आहे. या काळात ट्रम्प बोललेल्या एकूण शब्दांपैकी 5.1 टक्के शब्द खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे. सन 2017 चा हिशोब केला, तर ट्रम्प यांनी दररोज सरासरी 2.1 खोटे दावे केले असल्याचे दिसून आले आहे.
ट्रम्प यांनी मीडियावर अनेकदा खोट्या बातम्यांचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे, तर फेक न्यूज ऍवार्डस त्यानी दिली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच खोटेपणाचे असे प्रदर्शन लोकांसमोर मांडण्यात आले आहे. अठरा महिन्यात ट्रम्प एकूण 13 लाख 40 हजार 330 शब्द बोललेले आहेत. आणि त्यापैकी 5.1 टक्के शब्द खोटे असल्याचे म्हणजे त्यांच्या दर 14 शब्दांपैकी 1 शब्द खोटा असतो असे दिसून आलेले आहे. कॅनडातील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.