breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

MHT CET २०२३ परीक्षेचा निकाल आज जाहीर! रिझल्ट पाहण्यासाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या

MHT CET २०२३ परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. MHT MHT CET २०२३ परीक्षेचा निकाल आज सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी निकाल जाहीर होईल.

विद्यार्थ्यांनो निकालानंतर राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतील. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी MHT CET २०२३ च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org ला भेट द्यावी लागणार आहे.

हेही वाचा – वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध! अजित पवार

राज्यातील PCM या ग्रुपसाठी परीक्षा ९ ते १४ मे दरम्यान घेण्यात आली होती. तर PCB या ग्रुपची परीक्षा १५ ते २० मे दरम्यान झाली होती. राज्यातील विविध केंद्रांवर हि परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. या परीक्षेला जवळपास ४.५ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. त्यामुळे आता आज ४.५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं भविष्य ठरणार आहे.

MHT CET २०२३ रिझल्ट पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा!

  • प्रथमतः cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर पुढे Check MHT CET Result 2023 या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा.
  • अशाप्रकारे तुम्हाला निकाल पाहायला मिळेल.
  • मात्र निकाल चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट आवर्जून काढा.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button