breaking-newsराष्ट्रिय

‘हैदर’मधील तो कलाकार झाला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि…

श्रीनगरमध्ये मुजगुंड येथे ९ डिसेंबर रोजी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या १८ तासांच्या चकमकीनंतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कंठस्थान घालण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकजण स्थानिक तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा तरुण अभिनय क्षेत्रात काम करत होता आणि त्याने ‘हैदर’ या सिनेमांमध्ये अभिनयही केला होता.

साकीब बिलाल असे या ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. साकीबने  अकरावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होता. लष्कराबरोबर झालेल्या चकमकीमध्ये साकीबबरोबरच नववी इयत्तेमध्ये शिकणारा आणखीन एका मुलगा ठार झाला. हे दोघेही हाजीन बंडीपोरा येथील एका शाळेत शिक्षण घेत होते. साकीब आणि त्याचा मित्र ३१ ऑगस्टपासून घरातून पळून गेले होते. त्यानंतर थेट त्यांच्या मृत्यूचीच बातमी आल्याने दोघांच्या घरच्यांना धक्का बसला आहे. साकीबने दहशतवादाचा मार्ग का निवडला हा प्रश्न आम्हालाच पडला आहे असं त्याच्या घरच्यांनी सांगितले आहे.

‘आम्ही मागील एका महिन्याहून अधिक काळापासून जागोजागी जाऊन त्याचा शोध घेत होतो. मात्र आम्हाला तो सापडला आणि आता ही बातमी समोर आल्याने आम्हाला धक्काच बसला आहे’, असं साकीबबद्दल बोलताना त्याचा मामा असिम अजीज याने सांगितले. त्याला इंजिनियरिंग क्षेत्राची आवड होती. तो दहशतवादी संघटनेत का सहभागी झाला हे आम्हाला समजत नाहीय. घरातील सामान आणण्याचे कारण देत तो घराबाहेर पडला त्यानंतर तो कधी घरी परतलाच नाही. त्याला आणि त्याच्या मित्राला एका व्यक्तीसोबत बाईकवर बसून जाताना स्थानिक लोकांनी शेवटचे पाहिले होते अशीही माहिती असिमने दिली.

अकरावीत शिकत असणाऱ्या साकीबला खेळांची आवड होती. तो फुटबॉल, तायक्वाँडो आणि कब्बडी खेळायला. या चकमकीत ठार झालेला दुसरा मुलगा हा एका गरीब कुटुंबातून होता तर साकीबच्या कुटुंबाची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे.

खेळाबरोबरच साकीबला अभिनयाचीही आवड होती असे त्याच्या घरचे सांगतात. साकीबने विशाल भारद्वाज यांच्या हैदर सिनेमामध्ये एक पात्र साकारल्याची आठवणही त्याच्या घरच्यांनी सांगितले. साकीबने हैदर सिनेमामध्ये काम केले तेव्हा तो सहाव्या इयत्तेमध्ये शिकत होता. एका दृष्यात त्याने चॉकलेटवाल्या मुलाची तर दुसऱ्या दृष्यात त्याने बॉम्ब हल्ल्यातून बचावलेल्या मुलाची भूमिका साकारली होती अशी माहिती त्याच्या मामाने दिली. लहान वायापासूनच साकीब स्थानिक स्तरावरील लहान नटाकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारायचा अशी माहिती त्याच्या मामाने दिली. हैदरमध्ये काम करण्याआधी साकीबने ‘वेथ ची येही’ या नाटकामध्ये प्रमुख भूमिका केली होती. टागोर हॉल येथे झालेल्या शोनंतर त्याला सर्वोत्तम कालाकाराचे पारितोषिकही मिळाले होते. याच नाटकाच्या एका कार्यक्रमासाठी तो ओडिशालाही जाऊन आल्याचे त्याच्या मामाने सांगितले.

ही दोन्ही मुले घर सोडून गेल्यानंतर लगेचच त्यांनी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यास सुरुवात केल्याचे पोलिस सांगतात. या दोघांना लष्कराने ठार केल्यानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांना अडकवणाऱ्या दहशवादी संघटनांबरोबरच या तरुण मुलांना थेट ठार करणाऱ्या भारतीय लष्कराच्या कारवाईवरही स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button