breaking-newsराष्ट्रिय

…म्हणून पासपोर्टवर छापण्यात आलं आहे ‘कमळ’ चिन्ह

महाईन्यूज |

बनावट पासपोर्ट ओळखता यावेत यासाठी नव्याने देण्यात येणाऱ्या पासपोर्टवर ‘कमळ’ चिन्ह छापण्यात आल्याचे गुरुवारी सरकारच्या वतीने लोकसभेत स्पष्ट करण्यात आले. अन्य राष्ट्रीय चिन्हांचाही वापर करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.

पासपोर्टवर कमळ चिन्ह छापण्याबाबतचा प्रश्न बुधवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केला होता. केरळमधील कोझिकोडे येथे नवे पासपोर्ट वितरित करण्यात आले त्यावर कमळ चिन्ह छापण्यात आले असल्याचा मुद्दा काँग्रेसचे सदस्य एम. के. राघवन यांनी सभागृहात शून्य प्रहराला उपस्थित केलेला होता. ही बाब एका वृत्तपत्राने ठळकपणे प्रसिद्ध केली असून हा सरकारी आस्थापनांचे आणखी ‘भगवेकरण’ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का, असा सवाल राघवन यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button