breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वाईन फ्लूसंदर्भात नियोजनात्मक जागृती करा- खासदार साबळे यांच्या आरोग्य विभागाला सूचना

पिंपरी – स्वाईन फ्लू या आजारावर प्रतिबंध हेच मुख्य औषध असल्याने याबाबत व्यवस्थित नियोजन करून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात स्वाईन फ्लूसंदर्भात घेण्यात आलेल्या विभागस्तरीय तातडीच्या बैठकीत खासदार अमर साबळे यांनी या सूचना दिल्या. यावेळी आयुक्त श्रावण हार्डीकर, प्रवीण आष्टीकर, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेवक माऊली थोरात, नगरसेवक केशव घोळवे, महिला मोर्चा अध्यक्ष शैला मोलक, डॉ. देशमुख यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.
खासदार साबळे म्हणाले, स्वाईन फ्लू हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी त्यावर योग्य वेळेत उपचार केल्यास तो निश्चित बरा होतो. एच1 एन1 या विषाणूमुळे हा आजार पसरतो. साधा फ्लू व स्वाईन फ्लू यांची लक्षणे एकसारखीच असल्याने स्वाईन फ्लू आजाराची त्वरीत निदान करूण त्यावर वेळीच उपचार केले जात नाही. त्यामुळे हा आजार वाढून नियंत्रणात आणण्यास अवघड होते आणि अशा रूग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. सार्वजनिक ठिकाणी जसे शाळा, महाविद्यालय, कंपनी, कार्यालय यामध्ये स्वाईन फ्लू आजाराबाबत जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
नागरिकांनी ताप येणे, घसा खवखवणे, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी अशा स्वरूपाची काही लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे. तसेच वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हाथ धुवावेत, हस्तांदोलन अथवा अलिंगण टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये, शिंकताना व खोकताना रूमालाचा वापर करावा, वारंवार नाकाला व तोंडाला हाथ लावू नये. सर्दी खोकला असलेल्या नागरिकांनी त्वरीत डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यूचा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: गर्भवती महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी या आजाराबाबत विशेष काळजी घ्यावी. पौष्टिक आहार व भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी, अशा स्वरूपाची काळजी घेतल्यास वेळेतच स्वाईन फ्लू या आजारावर प्रतिबंध घालणे सोपे होईल.
शासकीय व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी स्वाईन फ्लू वा साधा फ्लू यांच्या लक्षणांमध्ये साम्य असल्यामुळे स्वाईन फ्लूच्या लक्षणांना प्राधान्याने ओळखून त्यावर त्वरीत उपचार करावा. स्वाईन फ्लू उपचारात व निदानात विलंब केल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून त्याची त्वरीत गंभीर दखल घेण्यात येईल, असे निर्देश खासदार साबळे यांनी दिले.
त्याचप्रमाणे स्वाईन फ्लूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी क्लस्टर मॅपिंग करण्यावर भर देऊन महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय तसेच खाजगी डॉक्टरांची कार्यशाळा घेण्यात यावी. ज्यामुळे स्वाईन फ्लूमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. रूग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूचे कारणे शोधावित. ज्यामुळे स्वाईन फ्लूसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल, अशा सुचनाही खासदार साबळे यांनी बैठकीत दिल्या. सदर बैठकीत स्वाईन फ्ल्यूबाबत महापालिकानिहाय आढावा घेण्यात आला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button