breaking-newsपुणे

कठूआ व उन्नाव घटनांतील आरोपींना फाशींची शिक्षा करा

पिंपरी- कठूआ व उन्नाव येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये दोषी असणा-यांना आरोपींना फाशींची शिक्षा करावी, याकरिता कुल जमाअती तंजीम व सर्वधर्म बंधुभाव एकता मंचच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. 
ही रॅली पिंपरी येथील भाजी मंडई ब्रिज खालून पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे रॅलीचा समारोप झाला.हातात निषेधाचे झेंडे व पीडितांना न्याय देण्याची मागणी करणारे फलक घेऊन महिला व मुली मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी असिफाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत घटनेचा निषेध नोंदविला. शालेय विद्यार्थ्यांनी देखील जस्टीस फॉर असिफा असे लिहिलेले फलक उंचावत घटनेचा निषेध केला. यावेळी “मंदिर जैसे शुध्द जगह पर अशुध्द काम”  “अब हमे शरम आती है कहते हुए सारे जहा से अच्छा हिंदुस्थान हमारा,”
यावेळी देशात वारंवार होत असलेल्या महिला अत्याचार व बलात्काराच्या घटना शरमेने मान खाली घालायला लावणा-या असून महिला असुरक्षित आहेत. शासनाच्या बघ्याच्या भूमिकेमुळे  महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओ असा नारा दिला जातोय तर दुसरीकडे अत्याचाराने महिला त्रस्त आहेत. अत्याचार करणा-या नराधामांना तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी  म्हणजे अशा घटना करण्यास धजावणार नाही, असा सूर या रॅलीच्या निमित्ताने उमटल्याचे दिसून आले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button