breaking-newsमनोरंजन

सैफचा मुलगा इब्राहिमही बॉलिवूडच्या वाटेवर ?

सारा अली खानबरोबर आता सैफचा मुलगा इब्राहिम खाननंही बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत नशीब आजमावण्याचं ठरवलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत सैफनं इब्राहिमला बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता आणखी एक नवाब बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

इब्राहिमनं पूर्वीच बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्याला असं वाटतं की या क्षेत्रात करिअर घडवणं सोप्प आहे पण, मी त्याला सांगितलं इथे काम मिळवणं फार सोप्पी गोष्ट नाही. खूपच कमी लोकांना यशस्वी होण्याची संधी या क्षेत्रात मिळते. त्यामुळे करिअर बाबत तो काय निर्णय घेईल याची काळजी मला असेलच पण त्याला पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे’ असं सैफ म्हणाला.

त्यामुळे येत्या काही वर्षांत इब्राहिम आपलं नशीब आजमवण्यासाठी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार हे नक्की. पण इब्राहिम आधी सैफची मुलगी सारा खान ‘सिम्बा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर दुसरीकडे शाहरुखचा मुलगा आर्यन खानदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे त्याच्या पदार्पणाची जाबाबदारी दिग्दर्शक करण जोहरनं घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button