शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनंयभंग; हिंजवडीतील धक्कादायक प्रकार
पिंपरी (महा ई न्यूज) – इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार हिंजवडी पोलिसांच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
संतोष हरिभाऊ भेगडे (वय ४२, रा. शिंदेवस्ती, नांदेगाव, मुळशी) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी एका शिक्षीकेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत विद्यार्थिनी हिंजवडी परिसरातील एका जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे. तर, भेगडे हा त्यांचा वर्गशिक्षक आहे. एक महिन्यापुर्वी पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण दुपारी साडेतीनच्या सुमारास वर्गात बसल्या होत्या. त्यावेळी भेगडे तिथे आले आणि त्याने पीडित मुलीच्या मैत्रीणीला बाहेर पाठवले. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधून विनयभंग केला. हिेंजवडी पोलिस तपास करत आहेत.