breaking-newsमनोरंजन

शाहरुखचा इरफानला मदतीचा हात

लंडनमध्ये दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या इरफान खानला शाहरुख खानने मदतीचा हात दिला आहे. लंडनमधील आपल्या घराची चावी देत शाहरुखने आपल्या मित्राला छोटीशी मदत केली आहे. उपचारासाठी लंडनला जाण्याअगोदर इरफानने शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शाहरुखने इरफानच्या घरी जात त्याची भेट घेतली. तेव्हाच शाहरुखने आपल्या लंडनमध्ये असलेल्या घराची चावी इरफान खानला दिली असल्याचे समजते. इरफान आणि त्याचे कुटुंब घरच्या वातावरणात राहू शकेल, या त्यामागचा उद्देश होता.

शाहरुख आणि इरफान हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बॉलिवूडच्या या दोन्ही सुपरस्टार्सने “बिल्लु’ चित्रपटात एकत्र कामही केले आहे. दरम्यान, इरफान सध्या न्यूरोएन्डोक्रिन कॅन्सरने ग्रस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने लंडनमधील काही फोटो शेअर केले.

मागील 3 महिन्यांपासून तो लंडनमध्ये न्यूरोएन्डोक्रिन कॅन्सरवर उपचार घेत आहे. तसेच इरफानने एक भावनिक पत्रही लिहिले आहे. या संवेदनशील पत्रातून इरफान मानसिकदृष्ट्‌या खचल्याचे दिसत आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसून येत आहे. तो वर्षाखेर भारतात परत येण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button