breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ? उत्पादन व विक्री थांबविण्याचे आदेश

चिक्की म्हटलं की लोणावळ्याच्या मगनलाल चिक्कीचं नाव येतंच. तोंडाला पाणी सुटावं अशा या प्रसिद्ध मगनलाल चिक्कीच्या ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दणका दिला आहे. चिक्कीचे उत्पादन करू नये, व विक्री थांबवावी असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत.

चिक्कीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी आढळल्या असून अन्न व सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याने उत्पादकांना नोटीस जारी करून कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे भागीदार अशोक भरत अगरवाल यांच्या उपस्थितीत एफडीएचे अधिकारी आर. आर. काकडे यांच्या पथकाने केलेल्या तपासणींतर्गत काही त्रुटी आढळल्या आहेत. कंपनीने उत्पादित खाद्यपदार्थाची कोणतीच चाचणी तसेच तपासणी केली नसल्याचे आढळून आले आहे. त्यातून खाद्यपदार्थ मानवी सेवनास सुरक्षित असल्याची कोणतीही खात्री किंवा हमी नसल्याने विक्रीसाठी उत्पादित केलेला कोणताही खाद्यपदार्थ हा मानवी सेवनासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासल्याशिवाय त्याची विक्री करू नये असे आदेश दिले आहेत. ‘फूड्स सेफ्टी अॅन्ड स्टॅन्डर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (एफएसएआय) मान्यताप्राप्त प्रयोगशाळा अथवा स्वतःच्या प्रयोगशाळेत खाद्यपदार्थांची तपासणी करून घेणे आवश्यक होते, पण तशी कोणतीच तपासणी करण्यात आली नसल्याचं समोर आल्यानंतर हे आदेश देण्यात आलेत.

या संदर्भात कायद्यानुसार अटींची पूर्तता केल्यानंतरच उत्पादन व विक्री करता येईल. अन्न व सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम ५५ नुसार त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित कंपनीच्या प्रत्येक संचालकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button