breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुग्णालयात घेऊन जाताना कारला आग, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी – -हदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना कारने अचानक पेट घेतला. कारमधील तिघांना सुखरूप काढला आहे. मात्र, एका महिलेचा रुग्णालयात पोहोचेपर्यंत मृत्यू झाला आहे. कारचालक संबंधित महिलेचा पती असून त्याने कारमधील सर्वांना वाचविण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले. परंतु, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज सोमवारी (दि. 10) मध्यरात्री वाकड जकात नाक्याजवळ घडली.

 

संगीता मनीष हिवाळे ( वय 44, रा. नखाते वस्ती, काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री संगीता यांना -हदयविकाराचा झटका आला. त्यामुळे मनीष यांनी त्यांना तात्काळ वाकड येथील चांदव रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होऊ शकत नसल्याने ते संगीता यांना दुसऱ्या रुग्णालयात कार मधून (एम एच 14 / ए एन 3709) घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मनीष यांच्या आई, मुलगा आणि भाचा देखील सोबत होते. वाकड मधील जकात नाक्यासमोर येताच त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. मनीष यांनी त्यांच्या आई, मुलगा आणि भाच्याला गाडीबाहेर काढले. त्यानंतर कार पेटल्याने कार आतमधून लॉक झाली. मनीष यांनी संगीता यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले.

 

अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच, संत तुकाराम नगर अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, घटनेत संगीता यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button